
राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यासाठी अनेक महत्वपु्र्ण घोषणा केल्या होत्या. यावेळी त्यांनी केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या 'पीएम किसान सन्मान निधी योजने'च्या धर्तीवर महाराष्ट्रातदेखील त्याच योजनेला जोडून 'शेतकरी महासन्मान निधी योजना' राबवणार असल्याचं जाहीर केलं होतं. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारचे 6 हजार रुपये आणि राज्य सरकारचे 6 हजार असे वर्षाकाठी हेक्टरी एकूण 12 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार होते.
आज (30 मे) रोज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता शेतकऱ्यांना एका हेक्टरला वर्षाकाठी 12 हजार रुपये मिळणार असल्याची महत्वपुर्ण घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. याच बरोबर राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा मिळणार आहे. तसेच राज्याला माहिती तंत्रज्ञानात देशात आघाडीवर नेण्यासाठी नवीन धोरणास मान्यात दिली असून यामुळे राज्यात 95 हजार कोटींची गुंतवणूक येणार असल्याचे देखील त्यांनी सांगतिलं आहे.
आज मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांमळे महाराष्ट्राच्या जनतचे हित जपले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. एक रुपयात पीक विमा देण्याच्या राज्यसरकारच्या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तसचे नवीन कामागार नियमांना मान्यात दिल्याने लाखो कामगारांचे देखील हीत जपले जाणार आहे. असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.