आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला आता मुहूर्त ?
ANI

आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला आता मुहूर्त ?

आता खरी कसोटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असणार आहे. कारण त्यांच्यासोबत जे आमदार आले आहेत, त्यांच्यातील अनेक जणांना मंत्री होण्याची इच्छा

राज्यातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्याने शिंदे-फडणवीस सरकारला संरक्षण मिळाले आहे. राज्यातील गेले आठ-नऊ महिने असणारी राजकीय अनिश्चितता आता संपली आहे. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला आता मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याचे संकेत दिले आहेत.

राज्यात सत्तांतर झाले. शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आले. आजच्या तारखेला राज्यात फक्त कॅबिनेट मंत्रीच आहेत. अठरा मंत्री आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असे मंत्रिमंडळ आहे. राज्यमंत्री अद्यापही नेमलेले नाहीत. मात्र, आता न्यायालयाच्या निकालानंतर राज्य सरकारवरील अनिश्चिततेचे सावट दूर झाले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. आता कॅबिनेट तसेच राज्यमंत्री यांची नियुक्ती करण्यात येईल.

आता खरी कसोटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असणार आहे. कारण त्यांच्यासोबत जे आमदार आले आहेत, त्यांच्यातील अनेक जणांना मंत्री होण्याची इच्छा आहे. निकालाचे कारण देत अद्यापपर्यंत विस्तार प्रलंबित ठेवण्यात यश आले होते. मात्र, आता विस्तार करण्याचा दबाव वाढणार आहे. भाजपमध्ये देखील अनेक जण मंत्रिमंडळात येण्यास उत्सुक आहेत. त्यांच्याही अपेक्षा आता उंचावल्या आहेत. राज्यात आता येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहायला सुरूवात होईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in