आता रक्तदाबावर मिळणार रामबाण औषध

राज्यातील तीन संशोधकांना रक्तदाबावर प्रभावी औषध शोधण्यात मोठे यश
आता रक्तदाबावर मिळणार रामबाण औषध

जगभरातील कित्येक जण रक्तदाबामुळे त्रस्त असून, या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी जगभरातील संशोधक प्रयत्न करीत आहेत. अशातच राज्यातील तीन संशोधकांना रक्तदाबावर प्रभावी औषध शोधण्यात मोठे यश आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, या औषधाला केंद्र सरकारकडून पेटंटचे अधिकारदेखील प्राप्त झाले आहेत. औरंगाबादचे डॉ. आनंद कुलकर्णी, जळगावचे डॉ. जितेंद्र नाईक आणि डॉ. संजय तोष्णीवाल यांनी ही मोलाची कामगिरी केली आहे.

औषधासाठी संशोधकांना पेटंट कार्यालय, भारत सरकार येथून नुकतेच प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यांना पेटंट क्रमांक ३९८५६२ देण्यात आला आहे. पेटंटमध्ये रक्तदाबावरील संशोधकांनी शोधून काढलेले औषध व त्याचे सूत्रीकरण ‘सस्टेन्ड रिलीज मॅटोप्रोलॉल सॅक्सिनेत टॅबलेट फॉर्म अॅण्ड प्रेपरेशन देयर ऑफ’ याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. शास्त्रोक्त पद्धतीने रक्तदाबावरील त्याचे औषधी गुणधर्म सिद्ध करून दाखवल्याचे पेटंटमध्ये म्हटले आ

याआधीही पेटंट

रक्तदाबावरील या नवीन औषधाचे विदर्भ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, वाशिमचे संचालक डॉ. संजय तोष्णीवाल, डॉ. जितेंद्र नाईक आणि डॉ. आनंद कुलकर्णी यांनी संयुक्तरीत्या प्रभावी सूत्रीकरण केले आहे. याआधी डॉ. संजय तोष्णीवाल यांना कर्करोगावरील औषधाच्या संशोधनाकरिता जर्मनी येथून आणि संधिवाताच्या औषधाच्या संशोधनाकरिता भारत सरकारद्वारे पेटंट देण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in