आज मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर केलेल्या भाषणात भारतातून फरार झालेल्या झाकीर नाईकचा उल्लेख करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुपूर शर्माचे समर्थन केले. तसेच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की, आतापर्यंत आपण जेवढी आंदोलने केली तेवढी अन्य कोणत्याही पक्षाने केलेली नाही. राज पुढे म्हणाले की, "मशिदीवरील भोंगे काढा, भोंगे काढा. किती वर्षांपासून सुरू झाले?" पण आम्ही या भोंग्यांना पर्याय दिला. एकतर भोंगे काढा नाहीतर आम्ही तिथे येऊन हनुमान चालिसाचा पाठ करू. मग सर्वजण भोंगे उचलू लागले. आता मुस्लीम समाजातील अनेकजण कानाला बरे वाटू लागल्याचे सांगत आहेत.
राज यांनी त्याच संदर्भात नुपूर शर्माबाबतच्या वादावर भाष्य केले. “त्या नुपूर शर्मा बोलल्या. त्यांना काढून काय टाकले? सर्वांची माफी काय मागितली. मी त्यांची बाजू घेतली. त्या मनातलं बोलत नव्हत्या. राज यांनी नुपूर शर्माच्या विधानाचे समर्थन केले आहे की, त्या सध्या काय घडत आहे याबद्दल बोलत होत्या. तसेच, राज यांनी पुढे भारतातून फरार झालेला मुस्लिम धर्मोपदेशक आणि इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा संस्थापक झाकीर नाईक यांचा उल्लेख केला. “तुमचा तो नाईक कोण आहे? झाकीर नाईक यांची मुलाखत पहा. झाकीर नाईक हा मुस्लिम आहे. झाकीर नाईकच्या एका मुलाखतीत त्यांनी नुपूर शर्मा जे सांगत होत्या तेच बोलून दाखवले आहे, असे राज यांनीही आपल्या भाषणात म्हटले आहे.