अमरावतीतही नुपूर शर्माची पोस्ट व्हायरल केल्याने हत्या

एनआयचे एक पथक शनिवारी अमरावतीत दाखल झाले, त्यांनी स्थानिक पोलिसांकडून या घटनेची माहिती घेतली.
अमरावतीतही नुपूर शर्माची पोस्ट व्हायरल केल्याने हत्या

महाराष्ट्रात अमरावती येथील फार्मासिस्ट उमेश कोल्हे (५४) यांची हत्या नुपूर शर्माची पोस्ट व्हायरल केल्यानेच झाल्याचे उघड झाल्यामुळे देशभर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपासही ‘एनआयए’कडे सोपवण्यात आला असून त्यांनी उदयपूर हत्येशी या हत्येचे धागेदोरे जुळतात का, याचा तपास सुरू केला आहे. एनआयचे एक पथक शनिवारी अमरावतीत दाखल झाले, त्यांनी स्थानिक पोलिसांकडून या घटनेची माहिती घेतली.

उमेश कोल्हे हे मंगळवार, दि. २१ जून रोजी रात्री तहसील कार्यालय परिसरातील आपले मेडिकल स्टोअर्स बंद करून मुलगा संकेत व सून वैष्णवी यांच्यासोबत वेगवेगळ्या दुचाकीने घरी जात होते. मार्गात न्यू हायस्कूल मेन समोरील गल्लीत तिघांनी उमेश यांना अडवून चाकूने गळ्यावर वार करून त्यांची हत्या केली होती. उमेश यांचे शीर धडावेगळे करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु त्यांच्या मुलगा काही अंतरावरच झटापट पाहून त्याने वडिलांच्या दिशेने धाव घेताच हल्लेखोर उमेश यांच्या गळ्यावर वार करून मोटारसायकलवरून पसार झाले, अशी माहिती त्यांचा मुलगा संकेत यांनी दिली.

उमेश कोल्हेंच्या हत्येची योजना आठवडाभरापासून आखली जात होती. त्यासाठी दोन गट तयार करण्यात आले होते. त्यांच्या माध्यमातून रेकी करण्यात आली. त्यांची मेडिकल बंद करण्याची वेळ, जाण्याचा मार्ग याची माहिती घेतल्यानंतर अत्यंत नियोजनबद्धरित्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली कोल्हे यांनी नुपूर शर्माच्या वादग्रस्त विधानाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्या होत्या. त्यामुळे कट्टरपंथीयांना हाताशी धरून हे हत्याकांड घडवल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. अमरावतीचे पोलीस उपायुक्त उमेश साळवी यांनी याला पुष्टी दिली आहे. उदयपूरमधील कन्हैयालालच्या हत्येप्रमाणेच उमेश कोल्हेंचीही हत्या करण्यात आली. दोन्ही घटनेत बरेच साम्य आहे. उदयपूरच्या हत्येचा तपास गृह मंत्रालयाने एनआयएकडे सोपवला आहे. त्यात पाकिस्ताननी संघटनांचा सहभाग आढळून आला आहे. त्यामुळे ही घटना याच कटाचा भाग असू शकतो असा केंद्रीय केंद्रीय गृह मंत्रालयाला संशय आहे. त्यामुळे अमरावतीचे प्रकरणही एनआयएकडे सोपवण्यात आले आहे. या हत्येमागील कट, संघटनांचा सहभाग आणि आंतरराष्ट्रीय संबंधांची कसून चौकशी केली जाईल, स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in