परिचारिका अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; B.Sc नर्सिंगची यादी ८ ऑगस्ट, तर GNM, PHN ची ७ ऑगस्टला

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) राबविण्यात येणार्याय परिचारिका संवर्गातील विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
परिचारिका अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; B.Sc नर्सिंगची यादी ८ ऑगस्ट, तर GNM, PHN ची ७ ऑगस्टला
Published on

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) राबविण्यात येणार्याय परिचारिका संवर्गातील विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाची पहिली यादी ८ ऑगस्ट रोजी जाहीर होईल, तर सामान्य परिचर्या व प्रसाविका प्रशिक्षण (जीएनएम), सार्वजनिक आरोग्य परिचारिका (पीएचएन) व मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिका (डीपीएन) या अभ्यासक्रमाच्या पहिली यादी ७ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे.

बीएस्सी नर्सिंग महाविद्यालयांमधील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक सीईटी कक्षाने जाहीर केले. त्यानुसार बीएस्सी अभ्यासक्रमाची अंतिम गुणवत्ता यादी ४ ऑगस्ट रोजी जाहीर होईल. तर ५ ऑगस्ट रोजी जागांचा तपशील जाहीर होईल. प्रवेशासाठी विद्यार्थांना ५ ते ७ ऑगस्टदरम्यान महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरता येतील. त्यानंतर पहिली यादी ८ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थांना ९ ते १४ ऑगस्टदरम्यान महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

आरोग्य सेवा आयुक्तालयामार्फत सामान्य परिचर्या व प्रसाविका प्रशिक्षण (जीएनएम), सार्वजनिक आरोग्य परिचारिका (पीएचएन), मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिका (डीपीएन) हे अभ्यासक्रम राबवले जातात. डीपीएन या अभ्यासक्रमाची राज्यात केवळ २ महाविद्यालये असून, यामध्ये ४० जागा उपलब्ध आहेत. तसेच पीएचएन अभ्यासक्रमासाठी नागपूर येथे १ महाविद्यालय असून त्यामध्ये ३० जागा उपलब्ध आहेत. या दोन्ही अभ्यासक्रमाची पहिली यादी ७ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in