ओबीसी आंदोलन आता २० जानेवारीऐवजी २६ जानेवारीला!

मराठा समाजाने कुणबी समाजाचे आरक्षण घेऊ नये. जर मराठा समाजाने कुणबी समाजाचे आरक्षण घेतले तर मराठा समाजाचे नुकसानच आहे
ओबीसी आंदोलन आता २० जानेवारीऐवजी २६ जानेवारीला!

मुंबई : राज्यातील ओबीसी समाजाचे आंदोलन २० जानेवारी रोजी आझाद मैदानात होणार होते , ते आता २६ जानेवारी रोजी करणार आहोत. अशी माहिती ओबीसी जनमोर्चाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत गुरुवारी दिली.

मराठा समाजाने कुणबी समाजाचे आरक्षण घेऊ नये. जर मराठा समाजाने कुणबी समाजाचे आरक्षण घेतले तर मराठा समाजाचे नुकसानच आहे. मराठा समाजाला सध्या आर्थिक मागास प्रवर्ग मधून ज्या सवलती सुरू आहेत, त्या सवलती मराठा समाज जर कुणबी समाजात गेला तर रद्द होतील. त्यामुळे मराठा समाजाने वेगळा विचार करत आरक्षण मागावे, असे आवाहन शेंडगे यांनी केले.

जो प्रस्तापित मराठा समाज आहे. त्यांना राजकीय फायदा मिळावा म्हणून गरीब मराठ्यांना वेगळ्या मार्गावर भरकवटले गेले आहे. मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत ते गरीब मराठा समाजासाठी आहे. हे आम्हालाही मान्य आहे. गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका आमचीही आहे.पण त्यासाठी कुणबीच्या ताटातले न घेता वेगळ्या मार्गाचा विचार सरकारने करावा.असे यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित आलेले राष्ट्रीय साहित्य अकादमी पुरस्कार विजेते उचल्याकार लक्ष्मण गायकवाड यांनी सांगितले.

कुणबी समाजात जर मराठा समाज सामील झाला तर दोन्ही समाज अजून गरीब होईल. एका बसमधे ६० आसन व्यवस्था असताना त्यात ९० प्रवासी आहेत. त्यात अजून १५० प्रवासी घ्या म्हणून मागणी केली तर त्या बस चे कसे होईल. असे उदाहरण लक्ष्मण गायकवाड यांनी यावेळी दिले.

logo
marathi.freepressjournal.in