सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला; काँग्रेस नेते वडेट्टीवार यांची टीका

ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निराशेने लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदारी गावातील भरत कराड या ३५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. गेले काही दिवस मुख्यमंत्र्यांपासून ते ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष सांगत आहे की, सरकारच्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या हक्कावर गदा येणार नाही. पण हाच सरकारने केलेला विश्वासघात आहे, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
विजय वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदारी गावातील भरत कराड या ३५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे वृत्त धक्कादायक आहे. ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निराशेने या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. गेले काही दिवस मुख्यमंत्र्यांपासून ते ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष सांगत आहे की, सरकारच्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या हक्कावर गदा येणार नाही. पण हाच सरकारने केलेला विश्वासघात आहे, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

वडेट्टीवार म्हणाले की, मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या जीआर मध्ये आधी पात्र हा शब्द होता आणि अवघ्या काही तासात दुसरा जीआर काढून त्यातून पात्र हा शब्द वगळण्यात आला, इथेच ओबीसी समाजाचा घात सरकारने केला. सरकार आणि त्यांचे मंत्री वारंवार ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी भाषा करत असले तरी सत्य मात्र वेगळ आहे आणि हे आता जनतेला कळले आहे यातूनच निराशा येत आहे. मंत्र्यांनी ओबीसी प्रमाणपत्र मिळावल्याची चर्चा सुरू आहे, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in