OBC Sabha: अंबडमध्ये आज ओबीसींचा महाएल्गार; छगन भुजबळांसह अनेक दिग्गजांची उपस्थिती

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये म्हणून आज ओबीसी नेत्याची सभा आज जालना जिल्ह्यातील अंबड येथे पार पडणार आहे.
OBC Sabha: अंबडमध्ये आज ओबीसींचा महाएल्गार; छगन भुजबळांसह अनेक दिग्गजांची उपस्थिती

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये म्हणून आज ओबीसी नेत्याची सभा आज जालना जिल्ह्यातील अंबड येथे पार पडणार आहे. ओबीसी समाजाच्या वतीने 'आरक्षण बचाव एल्गार' सभेच आयोजन करण्यात आलं आहे.

आज होणाऱ्या या सभेला मंत्री छगन भुजबळ, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महादेव जानकर आणि आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार आहेत. राज्यातील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नका या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठा आंदोलन पेटलेल्या अंतरवली सराटीपासून केवळ 20 किमी अंतरावर अंबड येथे ही ओबीसी मोर्चाची जाहीर सभा होणार आहे.

राज्यातील ओबीसी समाजाच्या हक्कासाठी मी आज सभेला जातोय असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, राज्यात ओबीसी हा मोठा वर्ग आहे. या समाजाच्या हक्कांचे संरक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे. या समाजाच्या हक्कासाठी मी आज सभेला जात आहे. दुसऱ्यांच्या हक्काचं कोणी हिरावून घेऊ नये. संविधानाच्या संरक्षणचं कवच आहे ते तोडण्याचे काम कोणी करू नका, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

भाजपानेत्या पंकजा मुंडे या देखील या सभेला उपस्थित राहणार आहेत. मी आता याबद्दल काही संदेश देणार नाही. या विषयावर मी अनेकदा व्यक्त झाले आहे. माझ्या 'शिवशक्ती यात्रे'त ही मी माझं मत मांडलं आहे. ज्यावेळी ज्या ज्या घटना घडल्या त्या त्या वेळी मी माझी भूमिका मांडली आहे. आता वेगळं काही मांडण्याची मला आवश्यकता नाही. माझी भूमिका स्पष्ट आहे. माझ्या फॉलोअर्सला माहिती आहे. मेळाव्याला मी मनापासून शुभेच्छा देते, छगन भुजबळ हे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्याविषयी मला आदर आणि प्रेम आहे. मुंडे साहेबांनी जी वंचिताची चळवळ उभी केली त्याच्यात एक सच्चा मित्र म्हणून ते सोबत होते. ते काय बोलतात या विषयी आता उत्सुकता आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in