३ ऑक्टोबर हा 'मराठी अभिजात भाषा गौरव दिन'; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

३ ऑक्टोबर हा दिवस यापुढे 'मराठी अभिजात भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने शुक्रवारी घेतला.
३ ऑक्टोबर हा 'मराठी अभिजात भाषा गौरव दिन'; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
Published on

३ ऑक्टोबर हा दिवस यापुढे 'मराठी अभिजात भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने शुक्रवारी घेतला. मंत्रिमंडळ बैठकीस यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्री उपस्थित होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्य मंत्रिमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.

या संदर्भातील मंत्रिमंडळाचा ठराव मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी वाचून दाखवला. मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. रिद्धपूर येथे या विद्यापीठाचे मुख्यालय असणार आहे. मराठी भाषेतील अभ्यास, संशोधन याला चालना देता येणार आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे जगभरातील मराठी प्रेमींसाठी अभिमानास्पद, गौरवास्पद आहे. या निर्णयासाठी केंद्र सरकारचे अभिनंदन करत आहे, असे प्रस्तावात म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in