पुणे विद्यापीठात पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी आक्षेपार्ह मजकूर ; दोन संघटना आपापसात भिडल्याने विद्यापीठ परिसरात तणाव

या विषयांवर आम्ही विद्यापीठ प्रशासनाशी बातचीत केली. तर विद्यापीठ प्रशासन मुक गिळून गप्प आहे.
पुणे विद्यापीठात पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी आक्षेपार्ह मजकूर ; दोन संघटना आपापसात भिडल्याने विद्यापीठ परिसरात तणाव

पुणे विद्यापीठ परिसरांत सगळीकडे खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिला गेल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजप आणि एसएफआयचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत. यावेळी पोलिसांनी दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांमध्ये हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना शांत केल आहे. यावेळी एसएफआय संघटनेचे झेंडे देखील जाळण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

यावेळी डाव्या संघटनेचा असलेल्या लाल झेंडा पायाखाली टाकून भाजप युवा मोर्चाकडून निषेध करण्यात आला. तसंच युवा मोर्चाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर डाव्या संघटनांकडूनही इंकलाब जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. तर या पार्श्वभूमीवर विद्यापीठ परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठाच्या आठ नंबर होस्टेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह मजकूर लिहिला गेला होता. हा आक्षेपार्ह मजकूर कुणी लिहिला याचा शोध विद्यापीठाकडून सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी मजकूर लिहिल्याने पुणे भाजपच्या वतीने निषेध व्यक्त करत जोरदार आंदोलन करण्यातं आलं आहे.

यावेळी भाजप पुणे शाखेचे शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले की, काही दिवसांपासून विद्यापीठात अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. समविचारी संघटनांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात हा आक्षेपार्ह मजकूर लिहिला आहे. विद्यापीठात JNU ची पुनरावृत्ती घडविण्याच काम काही संघटना करत आहेत.

या विषयांवर आम्ही विद्यापीठ प्रशासनाशी बातचीत केली. तर विद्यापीठ प्रशासन मुक गिळून गप्प आहे. अनेक विद्यार्थी 10 वर्ष झाले इथं राहतात तरी विद्यापीठ प्रशासन शांत आहे. विद्यापीठानं तत्काळ कारवाई करावी. जे विद्यार्थी इथं शिकत नाहीत तरी अनधिकृतपणे विद्यापीठात राहतात त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी धीरज घाटे यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in