नाशिक, शिर्डी, पुणे शेअर टॅक्सीचा प्रवास महागला

नाशिक, शिर्डी, पुणे शेअर टॅक्सीचा प्रवास महागला

मुंबई : मुंबईहून नाशिक, शिर्डी आणि पुण्याला जाणाऱ्या शेअर टॅक्सीच्या दरात ५० ते २०० रुपयांची वाढ करण्यात आल्याचे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ही भाडेवाढ कधीपासून अंमलात येणार ते अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. वरील मार्गांवर धावणारी काळी-पिवळी बिगरवातानुकूलित आणि निळी-चंदेरी वातानुकूलित टॅक्सीच्या दरवाढीला मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (एमएमआरटीए) अलीकडेच झालेल्या बैठकीत मान्यता दिली. मुंबईहून वातानुकूलित टॅक्सीने नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांना १०० रुपये तर शिर्डीला जाणाऱ्या प्रवाशांना २०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. तर पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना वातानुकूलित आणि बिगरवातानुकूलित टॅक्सीने जाताना ५० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in