Maharashtra Accident Video: नागपुरात ‘हिट अँड रन’ बसच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

पुणे, बीड, संभाजीनगर, वरळीनंतर आता नागपूरमध्ये ‘हिट अँड रन’ची घटना उघड झाली आहे. नागपुरात सायकलवरून जाणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीला भरधाव बसने धडक दिल्याने सदर वृद्धाचा जागीच मृत्यू झाला.
Maharashtra Accident Video: नागपुरात ‘हिट अँड रन’ बसच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
@vani_mehrotra/X

नागपूर : गेल्या काही दिवसांत राज्यात ‘हिट अँड रन’च्या घटना वाढल्या आहेत. पुणे, बीड, संभाजीनगर, वरळीनंतर आता नागपूरमध्ये ‘हिट अँड रन’ची घटना उघड झाली आहे. नागपुरात सायकलवरून जाणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीला भरधाव बसने धडक दिल्याने सदर वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर बसचालक पसार झाला आहे. नागपुरात सायकलवरून जात असलेल्या एका ६० वर्षीय वृद्धाला एका भरधाव बसने धडक दिली. त्यामुळे वृद्धाचा तोल जाऊन ते खाली कोसळले. बस भरधाव असल्यामुळे सायकलवरून पडलेली वृद्ध व्यक्ती बसच्या चाकाखाली आली. जखमी अवस्थेत या वृद्ध व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर बसचालक पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गेल्या २४ तासांत नागपुरात ‘हिट अँड रन’च्या दोन घटना घडल्या आहेत.

गिट्टीखदान पोलीस ठाणे परिसरात एका कारच्या धडकेत दिनेश खैरनार या तरुणाचा मृत्यू झाला. तसेच मॉर्निंगवॉक करणाऱ्या प्रवीण गांधी या रेल्वे अधिकाऱ्याला एका कारने उडवले.

या दोन्ही घटनांमध्ये चालक घटनेनंतर पळून गेल्याचे समोर आले आहे. संबंधित रेल्वे अधिकाऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

logo
marathi.freepressjournal.in