मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त नीलम गोऱ्हेंनी दगडूशेठ चरणी अर्पण केला ६० किलोंचा मोदक

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशास महाआरती करून आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी आघाडीस यश मिळावे, त्यांचे जास्तीजास्त...
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त नीलम गोऱ्हेंनी दगडूशेठ चरणी अर्पण केला ६० किलोंचा मोदक

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस असून या निमित्ताने आज(दि. ८) विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यावतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिरात ६० किलो वजनाचा मोदक अर्पण करण्यात आला. तसेच, शिवसेना पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने नीलम गोऱ्हे आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते महाआरतीही करण्यात आली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशास महाआरती करून आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी आघाडीस यश मिळावे, त्यांचे जास्तीजास्त खासदार, आमदार निवडून यावेत व पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रात, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन व्हावे, अशी प्रार्थना केल्याचे गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले. यावेळी पुण्यात अनेक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in