वाई येथील हरिहरेश्वर बँक घोटाळाप्रकरणी एकास अटक

संशयित पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी वाई व परिसरातून फरार आहेत
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक
Published on

कराड : सातारा जिल्हयातील वाई येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी खंडाळा शाखेचा प्रमुखाला पोलिसांनी अटक केली आहे. रणजित शिर्के (रा. यशवंतनगर, वाई) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे.त्याला वाई येथील न्यायालयात हजर केले असता त्याला शुक्र. १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश वाई न्यायालयाने दिला आहे. वाई तालुक्यातील हरिहरेश्वर बँकेतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात सन २०२१ मध्ये गुन्हा दाखल झाला होता.याप्रकरणी लेखापरीक्षकांनी बँकेचे संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांवर सभासद, खातेदारांच्या फसवणुकीचा ठपका ठेवला होता. या गुन्ह्यातील एक संशयित रणजित शिर्के हा खंडाळा शाखेचा प्रमुख म्हणून काम करत होता; मात्र तो २०२१ पासून फरार होता, अखेर त्याच्या ठावठिकानाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथून त्याला ताब्यात घेऊन अटक केले. दरम्यान, या प्रकरणातील संशयितांची पोलिसांनी धरपकड सुरू केल्याने, काहींचे धाबे दणाणले आहेत. अनेक संशयित पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी वाई व परिसरातून फरार आहेत; मात्र पोलिसांनी त्यांच्याही मुसक्या आवळाव्यात अशी मागणी बँकेचे सभासद, खातेदार व ठेवीदारांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in