श्री मलंगगडावर दरड कोसळून एक ठार, दोन जखमी; मुलाचा जीव वाचविताना वडिलांचा दुर्दैवी मृत्यू

अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगडावर दरड कोसळून एकाच कुटुंबातील एक जण ठार व दोन जण जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
श्री मलंगगडावर दरड कोसळून एक ठार, दोन जखमी; मुलाचा जीव वाचविताना वडिलांचा दुर्दैवी मृत्यू
toothmountainfarms.com
Published on

अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगडावर दरड कोसळून एकाच कुटुंबातील एक जण ठार व दोन जण जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींवर उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

श्री मलंगगडावर दर्गाजवळील वस्तीत गुलाम सय्यद हे ३५ वर्षीय गृहस्थ त्याच्या कुटुंबीयांसह राहत होते. सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरावर दरड कोसळली. यावेळी मुलाचे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांना आपले प्राण गमवावे लागले, तर त्यांचा दीड वर्षाचा मुलगा आणि पत्नी नाभिया हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जखमींना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी हिललाईन पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले असून पुढील तपास सुरू आहे. त्याचप्रमाणे शासकीय यंत्रणांकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

अनधिकृत बांधकामांमुळे पावसाळ्यात ग्रामस्थांना धोका

अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगडावर शासनाचे नियम डावलून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे केली जात आहेत. यामुळे डोंगराच्या आसपास व पायथ्याशी राहणाऱ्या ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात धोका निर्माण होत असतो. काही दिवसांपूर्वी वन विभागाने डोंगर परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली होती, मात्र काही दिवसांतच ही कारवाई बंद करण्यात आली होती.

logo
marathi.freepressjournal.in