'एक राज्य एक गणवेश' योजना यंदापासूनच; शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा

या वर्षीपासून राज्यातील सर्व सरकारी आणि अनुददानीत शाळांमधील विद्यार्थी हे एकाच गणवेशात दिसणार आहेत.
'एक राज्य एक गणवेश' योजना यंदापासूनच; शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा

15 जून पासून यंदाच्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. राज्य सरकार यंदा या शैक्षणिक वर्षापासूनच राज्यात 'एक राज्य एक गणवेश' योजना राबवणार आहे. शालेश शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबतची घोषणा केली आहे. या वर्षीपासून राज्यातील सर्व सरकारी आणि अनुददानीत शाळांमधील विद्यार्थी हे एकाच गणवेशात दिसणार आहेत. त्यांच्यासाठी एकच गणवेश लागू होणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. शासनाच्या निर्णयापु्र्वी ज्या शाळांनी गणवेशाच्या ऑर्डर दिल्या आहेत त्या शाळेतील विद्यार्थी हे तीन दिवस शासनाने निर्धारीत केलेला आणि तीन दिवस शाळेने दिलेला गणवेश वापरतील, असे देखील ते म्हणाले आहेत.

या बाबात बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, या वर्षापासून राज्यात 'एक राज्य एक गणवेश' धोरण राबवले जाणार आहे. ज्या शाळांनी राज्यशासनाच्या निर्णयापुर्वी गणवेशाची ऑर्डर दिली आहे. त्या शाळेतील विद्यार्थी तीन दिवस शाळेने दिलेला गणवेश तर तीन दिवस शासनाने ठरवून दिलेला गणवेश वापरतील. विद्यार्थी सोमवार, मंगळवार आणि बुधवार शाळेने दिलेला गणवेश वापरतील. तर गुरुवार शुक्रवार आणि शनिवार शासनाने निर्धारीत करुन दिलेला गणवेश वापरतील, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे.

असा असेल गणवेश

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर गणवेशाच्या रंगाबाबत माहिती देताना म्हणाले की, मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गर्द निळ्या रंगाची पँट, तर मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गर्द निळ्या रंगाचा स्कर्ट असा असेल. ज्या शाळेत सलवार कमीज असेल त्या शाळेत सलवार आकाशी रंगाची तर कमीज गर्द निळ्या रंगाची असेल, अशी माहिती केसरकर यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांचा गणवेश हा स्काऊट गाईडशी साम्य दर्शवणार असेल तसेच विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव झाली पाहिजे, या हेतून आम्ही निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ग्रामीण भागात काही विदयार्थी हे अनवाणी शाळेत जातात, आता तसे होणार नाही. कारण आम्ही गणवेश सोबत बूट आणि मोजे देखील देणार आहोत. याआधी फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गणवेश दिला जात होता. मात्र, आता सर्वांना गणवेश दिला जाणार असल्याचेही केसरकर यांनी सांगितले आहे.

हा निर्णय फक्त सरकारी शाळांसाठीच!

'एक राज्य एक गणवेश' हा निर्णय फक्त सरकारी शाळांसाठी असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. मात्र, खासगी शाळांनी देखील याबाबत विचार करावा, असे ते म्हणाले. मी एकदा संस्थांसोबत बसणार आहे. त्यांना देखील गणवेश दिला जाणार आहे. खासगी शाळा चालक यासाठी पुढे येणार का? हा देखील प्रश्न आहे. आमच्यासाठी मुलांचे हित सर्वोच्च असल्याचे दीपक केसरकर यांनी यावेली म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in