कांद्याच्या घसरणाऱ्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता; दोन दिवसांत कमाल दरात ३६०, सरासरी दरात १५० रुपयांची घसरण

महाराष्ट्रासह मध्यप्रदेश व दक्षिण भारतातून कांद्याची बंपर आवक सुरू झाल्याने तसेच नाफेड आणि एनसीसीएफने त्यांच्या बफर स्टॉकमधून विक्रीस सुरुवात केल्याने देशभरातील प्रमुख कांदा बाजारपेठांमध्ये दरात मोठ्या प्रमाणावर घसरण होत आहे. यामुळे आधीच संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
कांद्याच्या घसरणाऱ्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता; दोन दिवसांत कमाल दरात ३६०, सरासरी दरात १५० रुपयांची घसरण
Published on

हारून शेख/लासलगाव

महाराष्ट्रासह मध्यप्रदेश व दक्षिण भारतातून कांद्याची बंपर आवक सुरू झाल्याने तसेच नाफेड आणि एनसीसीएफने त्यांच्या बफर स्टॉकमधून विक्रीस सुरुवात केल्याने देशभरातील प्रमुख कांदा बाजारपेठांमध्ये दरात मोठ्या प्रमाणावर घसरण होत आहे. यामुळे आधीच संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या कमाल दरात तब्बल ३६० रुपयांची तर सरासरी दरात १५० रुपयांची घसरण झाली आहे. दरवाढीच्या आशेवर शेतकऱ्यांनी चाळीत साठवून ठेवलेला कांदा पावसामुळे खराब होण्याच्या मार्गावर असून त्याचा त्वरित विक्रीसाठी बाजारात ओघ वाढला आहे. परिणामी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होत असल्याने दर आणखी घसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

यंदा नाफेड आणि एनसीसीएफने मिळून सुमारे ३ लाख टन बफर स्टॉक तयार केला असून त्यातील कांद्याच्या विक्रीस प्रारंभ झाला आहे.

यामुळे बाजारात महाराष्ट्रातील कांद्याची मागणी घटल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळेनासा झाला आहे.

बाजार हस्तक्षेप योजना राबविण्याची मागणी

जुलै महिना संपत आला असला तरी उन्हाळ कांद्याचे दर अपेक्षेप्रमाणे वाढलेले नाहीत. परिणामी साठवलेल्या कांद्याच्या सडण्याची शक्यता आणि दर घसरल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांची आशा फोल ठरू लागल्याने सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना राबवावी आणि कांदा उत्पादकांना आर्थिक संरक्षण द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in