कांदा दर २०० रुपयांनी कोसळले; पोर्टल बंद केल्याने एनसीसीएफमार्फत कांदा खरेदी बंद?

एनसीसीएफने कांद्याची खरेदी थांबवल्यानंतर बाजार समितीमध्ये कांद्याच्या मागणीत वाढ झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
कांदा दर २०० रुपयांनी कोसळले; पोर्टल बंद केल्याने एनसीसीएफमार्फत कांदा खरेदी बंद?
Published on

हारून शेख/लासलगाव

एनसीसीएफने कांद्याची खरेदी थांबवल्यानंतर बाजार समितीमध्ये कांद्याच्या मागणीत वाढ झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कांदा दर २०० रुपयांनी कोसळल्याने सरासरी बाजार भाव तीन हजार रुपयांवर पोहोचल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या ग्राहक संरक्षण विभागाकडून ग्राहकांच्या हितासाठी किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत नाफेड, एनसीसीएफ या संस्थेमार्फत पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवून कांद्याची खरेदी सुरू करण्यात आली. मात्र उद्दिष्ट पूर्ण होण्याअगोदरच एनसीसीएफमार्फत कांदा खरेदीचे पोर्टल गेल्या चार-पाच दिवसांपासून बंद केल्याने जिल्ह्यातील बाजार समितीतील कांद्याच्या मागणीत अल्पशा वाढ झाली. यामुळे लासलगाव बाजार समितीत गेल्या आठवड्यात ३३११ ते ३१०० रुपये कांदा दर मिळत असतांना एनसीसीएफचे कांदा खरेदीचे पोर्टल पूर्ववत न झाल्यामुळे टप्प्याटप्प्याने कांदा दरात २०० रुपयांची घसरण झाली. गुरुवारी ३१०० ते २९०० रुपये इतका कांद्याला दर मिळाला आहे. एनसीसीएफ पाठोपाठ जर नाफेडची कांदा खरेदी बंद झाल्यास कांद्याचे दर आणखीन खाली येण्याची भीती या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in