Majhi Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा १७ ऑगस्ट रोजी शुभारंभ

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी आता केवळ अंगणवाडी सेविकांनाच अर्ज स्वीकारण्याचे अधिकार देण्यात आले आहे.
Published on

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी आता केवळ अंगणवाडी सेविकांनाच अर्ज स्वीकारण्याचे अधिकार देण्यात आले आहे. याबाबत शुक्रवारी निर्णय जारी करण्यात आला आहे.

महिलांचे सक्षमीकरण, सृदृढ आरोग्य यासाठी घरातील महिला अन्य कोणावर अवलंबून राहू नये यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे. "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेंतर्गत राज्यातील महिला लाभार्थ्यांची नोंदणी सप्टेंबर महिन्यात सुरू ठेवण्यास या आधीच मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने केवळ अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फतच अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in