... तरच शिवसेनेमध्ये राहणार - एकनाथ शिंदे

शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये गेले काही दिवसापासुन मतभेद सुरु होते
... तरच शिवसेनेमध्ये राहणार - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांचं बंड थंड करण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः हस्तक्षेप केला आहे. उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन त्यांचे निकटवर्तीय सूरतकडे रवाना होणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सूरतला जाणार आहेत.

काय आहे शिंदे यांचा प्रस्ताव 

-राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भाजप सोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव 

- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री व्हावे 

- तरच शिवसेनेमध्ये राहणार   

एकनाथ शिंदेसह अनेक आमदारांचे फोन ‘नॉट रिचेबल’ झाले होते. सध्या शिंदे आमदारांसोबत सुरत मध्ये गेले आहेत अशी माहिती सुत्रांकडून मिळली आहे. शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये गेले काही दिवसापासुन मतभेद सुरु होते. मुख्यमंत्र्यांनी आमदारांना मार्गदर्शन करावे अशी शिंदेची मागणी होती परंतु आदित्य ठाकरे यांनी आमदारांशी बातचीत केल्याने शिंदे नाराज झाले होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in