"...नाहीतर कर्नाटकात जातो", सांगली तालुक्यातील गावांचा राज्य सरकारला इशारा

सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. यंदा जुलै महिना संपत आला तरी जत तालुक्यात पुरेसा पाऊस पडलेला नाही
"...नाहीतर कर्नाटकात जातो", सांगली तालुक्यातील गावांचा राज्य सरकारला इशारा

सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. यंदा जुलै महिना संपत आला तरी जत तालुक्यात पुरेसा पाऊस पडलेला नाही. यामुळे हा तालुका भीषण पाणी टंचाईला सामोरं जात आहे. आता या दुष्काळग्रस्त नागरिकांनी राज्य सरकारविरोधात आंदोलन छेडलं आहे. काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वात जवळपास ५० हुन अधिक गावांनी संख येथे चक्री उपोषण सुरु केलं आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारला कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे.

या भागातक पिण्याचा पाण्यापासून जनावरांच्या चाऱ्यापाण्याचा तसंच शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर पुरेश्या पावसाअभावी खरीप हंगामाच्या १०० टक्के पेरण्या या वाया घेल्या आहेत. अशात अनेक गावांमधून पिण्याच्या पाण्याची मागमी वाढत आहे. मात्र, राज्य सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलन कर्त्यांकडून केला जात आहे.

सांगलीतील जत तालुक्यातील ६५ गावांनी दुष्काळी तालुक्याच्या विविध मागण्यासाठी आंदोलन छेडला आहे. राज्य सरकारला जर पाणी देता येत नसेल, दुष्काळ जाहीर करता येत नसले, तर आता आम्हाला कर्नाटकमध्ये जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी दुष्काळग्रस्तांनी गेली आहे. तुबची बबलेश्वरच्या माध्यमातून कर्नाटक सरकारकडून जतच्या ६५ दुष्काळी गावांना पाणी मिळू शकतं, मात्र, या बाबतीत राज्य सरकार टाळाटाळ करत असल्याचा तसंच विस्तारित म्हैसमाळ योजनेला निधीमंजूर करुन केवळ गाजर दाखवण्याचा उद्योग केला असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या गावांनी के

logo
marathi.freepressjournal.in