अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
Published on

अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर प्रथमश्रेणी न्यायालयाने मंगळवारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

वंचित बहुजन आघाडीने यासंदर्भात न्यायालयात अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने मंजूर करून सिटी कोतवाली पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ही माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवेधन पुंडकर यांनी दिली. यावेळी त्यांचे वकील अ‍ॅड. आशिष देशमुख हे उपस्थित होते.

अकोल्यातील जि.प.कडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावामध्ये परस्पर बदल करून पालकमंत्री बच्चू कडू यांनी एक कोटी ९५ लाख निधीचा अपहार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता. दरम्यान, जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी जिल्हा नियोजन समितीच्या १३ कामांना स्थगिती दिल्याने पालकमंत्री कडू यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी वंचितने केली आहे. आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. पुंडकर यांनी ही माहिती दिली.

logo
marathi.freepressjournal.in