अवयवदान प्रत्यारोपण प्रक्रियेस मिळणार नवे आयाम - आरोग्य मंत्री; अमरावती, कोल्हापूरमध्ये अवयव प्रत्यारोपण केंद्र

अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असून अवयवदान केल्याने दुसऱ्यांना जीवनदान मिळते. अवयवदान प्रत्यारोपण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी 'फेलोशिप इन क्रिटीकल मेडिसीन' हा पदव्युत्तर अभ्यासक्रम वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत तात्काळ सुरू करण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले
अवयवदान प्रत्यारोपण प्रक्रियेस मिळणार नवे आयाम - आरोग्य मंत्री; अमरावती, कोल्हापूरमध्ये अवयव प्रत्यारोपण केंद्र
सोशल मीडिया
Published on

मुंबई : अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असून अवयवदान केल्याने दुसऱ्यांना जीवनदान मिळते. अवयवदान प्रत्यारोपण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी 'फेलोशिप इन क्रिटीकल मेडिसीन' हा पदव्युत्तर अभ्यासक्रम वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत तात्काळ सुरू करण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. तसेच डॉक्टर व समन्वयकासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असून अमरावती, कोल्हापूर, नाशिक आणि सोलापूर येथे प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्र स्थापन करणार आहे. अमरावती, कोल्हापूर, नाशिक आणि सोलापूर येथे नवे प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये मानवी अवयव पुनर्प्राप्ती केंद्रांची निर्मिती आणि त्या ठिकाणी समन्वयकांची नियुक्ती करण्यात येईल.

आरोग्य भवन येथे आरोग्य मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली अवयव प्रत्यारोपणविषयी बैठक झाली. १ मे या महाराष्ट्र दिनी जिल्हास्तरावर अवयवदाते आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

गरजू रुग्णांना जीवनदान

अवयव प्रत्यारोपणासाठी आवश्यक रुग्णालय नोंदणी प्रक्रियेचा निर्णय तातडीने येईल. राज्यातील अवयवदान आणि प्रत्यारोपण प्रक्रियेला अधिक गती, पारदर्शकता आणि परिणामकारकता मिळवून अधिकाधिक गरजू रुग्णांना जीवनदान देता येणार असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बैठकीत सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in