भाजपतर्फे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

सकाळपासूनच या शिबिराचा लाभ घेण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. लायन्स हेल्थ क्लबच्या डॉक्टरांनी सर्व रुग्णांना सर्वोत्तम सेवा दिली आहे.
भाजपतर्फे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

मुरूड-जंजिरा : भाजप मुरूड व भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांच्यामार्फत मुरूड शहरासाठी भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन हिंदू बोर्डिंग येथे करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सुमारे १५० लोकांनी आपले डोळे तपासणी करून या सर्वांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. रविवारी सकाळपासूनच या शिबिराचा लाभ घेण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. लायन्स हेल्थ क्लबच्या डॉक्टरांनी सर्व रुग्णांना सर्वोत्तम सेवा दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in