उंड्री येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या वतीने हार्मोनी स्पोर्टस अ‍ॅण्ड आर्ट फेस्टचे आयोजन

स्वीमिंग, योगा, बॅडमिंटन, फूटबॉल, बास्केट बॉल, आर्ट, डान्स, म्यूझीक या स्पर्धा तीन दिवसात संपन्न होणार आहेत
उंड्री येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या वतीने हार्मोनी स्पोर्टस अ‍ॅण्ड आर्ट फेस्टचे आयोजन

पुणे : विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासात सामजस्यः क्रीडा आणि कला महत्वाची भूमिका बजावते. ही सामायिक दृष्टी, मूल्ये, पद्धती आणि निश्चित ध्येय प्रतिबिंबित करते. हाच मुख्य उद्देश्य ठेऊन मालपाणी फाउंडेशनच्या उंड्री येथील ध्रुव ग्लोबल स्कूलतर्फे ‘हार्मोनीः स्पोर्टस अ‍ॅण्ड आर्ट फेस्ट २०२३-२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव १ ते ३ नोव्हेंबर २०२३ रोजी उंड्री येथील स्कूलमध्ये संपन्न होणार आहे. अशी माहिती स्कूलच्या संचालिका अनिष्का यश मालपाणी व स्कूलच्या प्राचार्या शारदा राव यांनी दिली.

या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ १ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वा. होणार आहे. तसेच बक्षीस वितरण म्हणजेच महोत्सवाचा समारोप समारंभ ३ नोव्हेंबर रोजी होईल. आयोजित अंतर शालेय महोत्सवात पुणे विभागातील २८ शाळेतील ७०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यात स्वीमिंग, योगा, बॅडमिंटन, फूटबॉल, बास्केट बॉल, आर्ट, डान्स, म्यूझीक या स्पर्धा तीन दिवसात संपन्न होणार आहेत. हा महोत्सव एकतेच्या सहकार्यावर आणि विविध कला गुणांच्या एकत्रिकरणावर भर देणारा आहे. आंतरशालेय क्रीडा आणि कला महोत्सावात राज्यातील शाळांना एकत्र येण्यासाठी आणि सौहार्द, मैत्री आणि परस्पर आदराच्या वातावरणात त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन येथे पहावयास मिळणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in