औरंगाबादमध्ये मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये विशेष प्रदर्शनाचे आयोजन

उद्घाटनप्रसंगी सुधीर कोर्टीकर म्हणाले आपणास स्वातंत्र्य मिळवून प्रत्येक देणाऱ्या शहिदाचे बलीदान विसरता कामा नये.
औरंगाबादमध्ये मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये विशेष प्रदर्शनाचे आयोजन

औरंगाबाद मधिल मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये भारताच्या विभाजनाच्या वेळची छायाचित्रे काचं फलकात लावलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध टपाल तिकीट संग्राहक सुधीर कोर्टीकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले होते.औरंगाबादच्या मुख्य पोस्ट ऑफिसचे प्रवर डाकपाल एस.एल.बन्सोडे हे अध्यक्षस्थानी होते.

उद्घाटनप्रसंगी सुधीर कोर्टीकर म्हणाले आपणास स्वातंत्र्य मिळवून प्रत्येक देणाऱ्या शहिदाचे बलीदान विसरता कामा नये.प्रत्येकांनी आपल्या क्षेत्रात काम करताना प्रामाणीकपणे केले तर तीच खरी देशसेवा होईल.

प्रवर डाकपाल भाषणात म्हणाले, स्वतंत्र मिळवून देणाऱ्या प्रत्येक शुरवीरांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून आपणं भेद भाव विसरुन एकजुटीने काम करायला हवे.

औरंगाबादमधील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये भारताच्या विभाजनाच्या वेळच्या छायाचित्रांचे हे प्रदर्शन मुलांसाठी नागरिकांसाठी चार दिवस खुले ठेवण्यात आले होते.असंख्य नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली होती.

मुख्य पोस्ट ऑफिसमधील हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी उप डाकपाल एस.एम.कोली , शेख शकील, पी.बी.सूर्यवंशी, एस.बी.बुजाडे, एक.ए.शेळके, जयकुमार फड, श्रध्दा महाजन, प्राची सवई, ज्योत्स्ना यावलकर, सुनीता बागुल यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in