मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकीचं आयोजन ; आगामी निवडणुकांबाबत रणनिती आखणार ?

या बैठकीत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत
मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकीचं आयोजन ; आगामी निवडणुकांबाबत रणनिती आखणार ?

आज (२ ऑगस्ट) मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. चर्चगेट इथल्या एमसीए लाऊन्जमधअये रात्री साडेसात वाजेच्या सुमारास ही बैठक पार पडणार असून या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व आमदारांची उपस्थिती असणार आहे. तसंच महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या बैठकीला मार्गदर्शन करणार असल्याची माहिती बैठकीचे संयोजक आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.

या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षढ नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. तसंच काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, ममाजवादी पार्टीचे अबू आझमी, शेकापचे नेते जयंत पाटील, ठाकरे गटाचे गटनेते अजय चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड तसंच विधान परिषदेचे सदस्य ठाकरे गटाचे नेने अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले असून पुढील वर्षी या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीत देशात भाजप विरोधी पक्ष एकत्र येणार आहेत. विरोधकांची राष्ट्रीय स्तरावरील तिसरी बैठक मुंबई पार पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही आमदारांची संयुक्त बैठक महत्वाची संमजली जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसे अध्यक्ष शरद पवार यांनी ५ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीची बैठक बोलावली असून या बैठकीतून ते महाविकास आघाडीच्या नेत्यांची नाराजी दूर करणार असल्याचं सांगितलं जातंय.ल शरद पवार यांनी पुण्यातील लोकमान्य टिळक पुरस्कार वितरणाला हजेरी लावल्याने महाविकास आघाडीमध्ये नाराजी पसरली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in