चेंजिंग लँडस्केप ऑफ मीडिया या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

केंद्रीय माहिती, प्रसारण, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर हे नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख पाहुणे होते
 चेंजिंग लँडस्केप ऑफ मीडिया या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

डिजिटल कम्युनिकेशन आणि मीडिया तंत्रज्ञान अॅनिमेशन, गेमिंग, व्हिज्युअल इफेक्ट्स, एआर व्हीआर आणि टेलिव्हिजन, चित्रपट आणि ओटीटीसाठी सामग्री निर्मिती क्षेत्रात उदयास येत असलेल्या नवीन संधींसह मीडिया आणि मनोरंजन उद्योगाला आकार देत आहेत. स्कूल ऑफ मीडिया मॅनेजमेंट, सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एसएसपीयू), किवळे , पुणे यांनी २६ जून रोजी सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी कॅम्पस, किवळे ( मुंबई -पुणे एक्सप्रेसवे लगत) येथे भारत सरकारच्या माध्यम आणि मनोरंजन कौशल्य क्षेत्र (MESC) यांच्या संयुक्त विद्यमाने 'चेंजिंग लँडस्केप ऑफ मीडिया अँड एंटरटेनमेंट - २०२२’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. केंद्रीय माहिती, प्रसारण, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर हे नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख पाहुणे होते.

मंत्री अनुराज ठाकूर जी यांनी परिषदेचे उद्घाटन केले. परिषदेच्या उद्घाटन समारंभात मंत्र्यांच्या उपस्थितीत सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने मीडिया आणि एंटरटेनमेंट स्किल सेक्टर (एमईएससी) सोबत सामंजस्य करार देखील केला. उभय संस्थांनी विविध कौशल्य विकास उपक्रमांद्वारे या क्षेत्रासाठी कुशल मानव संसाधन निर्माण करण्याची वचनबद्धता व्यक्त केली.

यावेळी एसएसपीयूचे कुलपती डॉ.एस.बी. मुजुमदार, डॉ. स्वाती मुजुमदार, प्र-कुलगुरू, एसएसपीयू यांचे भाषण झाले. तर रेसुल Pookutty , ऑस्कर आणि BAFTA विजेते साउंड मिक्सर/डिझायनर यांना सन्माननीय अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in