पुण्याच्या कोचिंग सेंटरमध्ये ५०हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात एका कोचिंग सेंटरमध्ये ५०हून अधिक विद्यार्थ्यांना रविवारी अन्नातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे
पुण्याच्या कोचिंग सेंटरमध्ये ५०हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा

पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात एका कोचिंग सेंटरमध्ये ५०हून अधिक विद्यार्थ्यांना रविवारी (२१ एप्रिल) अन्नातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून विद्यार्थ्यांवर प्राथमिक तापसणी आणि उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. या कोचिंग सेंटरमध्ये NEET आणि JEE या परिक्षेची शिकवणी दिली जाते.

या प्रकरणी खेड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्र म्हणाले, कोचिंग सेंटरमध्ये JEE आणि NEET परीक्षेची कोचिंग दिले जाते. या कोचिंग सेंटरमध्ये ५०० हून अधिक विद्यार्थी हे शिकवणीसाठी येतात. विद्यार्थ्यांनी कोचिंग सेंटरमध्ये रात्री जेवण केल्यानंतर त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. यांची गंभीर दखल घेत विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी अन्नाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले असून पोलीस पुढील तापस करत आहेत.

दक्षणा फाउंडेशन ही एक सेवाभावी आणि गैरसरकारी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून देशभरातील ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल पण, हुशार विद्यार्थ्यांना NEET आणि JEE या परिक्षेची शिकवणी दिली जाते. या संस्थेतील विद्यार्थ्यांन अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.

logo
marathi.freepressjournal.in