
पुणे: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेले पुण्याचे कौस्तुभ गणबोटे यांच्या घरी जेष्ठ नेते शरद पवार यांनी भेट दिली. यावेळी कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी भावूक झाल्या.
कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी म्हणाल्या की, आम्हाला बऱ्याच लोकांनी मदत केली. सैन्य दलाची देखील मदत झाली, पण ती उशिरा झाली, तोपर्यंत हे गेले होते. माझ्या समोर गोळ्या घातल्या. तुम्ही अजाण वाचा म्हणून सांगत होते. आम्ही तिथे असलेल्या सगळ्या महिलांनी मोठ्या-मोठ्या अजाण म्हटले, पण त्यांनी आमच्या माणसांना मारून टाकले.
तिथे गेटवर एक मुस्लिम होता, तो म्हणत होता तुम्ही कशाला निरपराध लोकांना मारता त्यांनी काय चुकी केली आहे? त्याला सुद्धा पुढे करून गोळ्या घातल्या. आम्ही तिथे घोड्यावर बसून गेलो, तरी आम्हाला भीती वाटत होती. आम्ही पळत सुटलो तिथून तर चिखलात गुडघ्याइतके पाय खाली रुतत होते. आम्ही सगळे ‘अल्लाह हू अकबर’ म्हणायला लागलो असे कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीने सांगितले.