

पैठण : नुकत्याच पार पडलेल्या पैठण तालुका नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठे यश मिळाले, परंतु आता तालुक्यात राजकीय वातावरण पुन्हा तापलेले आहे. तालुक्यातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि एका मोठ्या नेत्या उद्धव गटाला रामराम ठोकून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. नगरपरिषद निवडणुकीत पैठण शहरात भाजपला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले, पाच वर्ष सत्तास्थानी असलेल्या पक्षासाठी हा मोठा धक्का ठरला. निवडणुकीनंतर अनेक पदाधिकारी आणि नेतेमंडळींवर अनामत रक्कम जप्त होण्याची चर्चा आहे.
आता भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी “एकला चलो” धोरण जाहीर केले असून, २०२९ च्या निवडणुकांची तयारी आतापासून सुरू झाली आहे.
तालुक्यात आर्थिकदृष्ट्या भक्कम असलेले अनेक नेते भाजपमध्ये आहेत, परंतु जनमत असलेला एकही नेता पक्षाकडे नाही. यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटातील एका महत्त्वाच्या नेत्यासह अनेक पदाधिकारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या हालचालीमुळे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठे बळ मिळण्याची शक्यता आहे.
असून, पैठण तालुक्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रवेशाच्या मागे कोणकोण पदाधिकारी सहभागी होणार आहेत, याची उत्सुकता सध्या शिगेला पोचली आहे.