पंढरपूर : संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात विकास आराखड्याचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे पंढरपूरला विठ्ठलाचे केवळ मुखदर्शन होणार असून चरणस्पर्श दर्शन १५ मार्चपासून दीड महिन्यांसाठी बंद राहणार आहे.
विठ्ठलाच्या मंदिर गाभाऱ्याचे काम करण्यासाठी मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या काळात रोज सकाळी ५ ते ११ वाजेपर्यंत फक्त मुखदर्शन सुरू राहणार आहे. विठ्ठल व रुक्मिणी मंदिर गाभाऱ्यात पुरातन रूप देण्याचे काम १५ मार्चपासून सुरू होणार आहे.