लोकसभेसाठी पंकजा मुंडे, शेलार, मुनगंटीवारांना संधी?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना १२ किंवा १३, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना ४ जागा देण्याची तयारी भाजप श्रेष्ठींनी दाखविली आहे.
लोकसभेसाठी पंकजा मुंडे, शेलार, मुनगंटीवारांना संधी?

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना १२ किंवा १३, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना ४ जागा देण्याची तयारी भाजप श्रेष्ठींनी दाखविली आहे. चंद्रपूरमधून सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार या विद्यमान मंत्र्यांना तसेच मुंबईतून भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना, तर बीडमधून माजी मंत्री पंकजा मुंडे यांना निवडणूक मैदानात उतरविण्याच्या तयारीत आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार आणि विजयसिंह मोहिते-पाटील गटात संघर्ष सुरू आहे. त्या संघर्षावर तोडगा म्हणून चंद्रकांतदादा यांनी या मतदारसंघातून लढण्याची तयारी ठेवावी, असे भाजप श्रेष्ठींना वाटते. त्याच सूत्रानुसार पुण्यातील उमेदवारीचा पेच सुटू शकतो. मुंबईतून पाच जागा भाजप लढणार आहे. त्यात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी निवडणूक लढवावी, असे पक्षीय पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

माजी मंत्री पंकजा मुंडे लोकसभा निवडणुकीसाठी सुरुवातीला अनुत्सुक होत्या. परंतु, आता त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविल्याने त्यांची बीड मतदारसंघातून उमेदवारी नक्की असल्याचे सांगण्यात येते. चंद्रपूरमधून निवडणूक लढविण्याची इच्छा नसल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तथापि, भाजप पक्षश्रेष्ठी त्यासाठी आग्रही आहेत. या निवडणुकीत काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in