सीएनजी एसटी गाड्यांमुळे पेणच्या प्रवाशांची गैरसोय!

पेण एसटी डेपोमधून एसटीच्या तालुक्यात रोज शेकडो फेऱ्या सुरू असतात. मात्र पूर्वी डिझेलवर धावणाऱ्या बसेस आता सीएनजीवर धाऊ लागले आहेत.
सीएनजी एसटी गाड्यांमुळे पेणच्या प्रवाशांची गैरसोय!

पेण : पेण जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असून मुंबई गोवा महामार्गालगत असल्याने पेण तालुक्याला भौगोलिक महत्त्व आहे. पेणचे एसटी डेपो हे पेण शहरामध्ये आहे. या एसटी डेपोमध्ये पेण तालुक्यातूनच नव्हे, तर जिल्ह्यातून हजारो प्रवाशांची एसटीने ये-जा सुरू असते. पेण तालुक्यातील नागरिकांना प्रवास करण्यासाठी महत्त्वाचा आधार म्हणजे एसटी बस हा आहे.

पेण एसटी डेपोमधून एसटीच्या तालुक्यात रोज शेकडो फेऱ्या सुरू असतात. मात्र पूर्वी डिझेलवर धावणाऱ्या बसेस आता सीएनजीवर धाऊ लागले आहेत. पूर्वी पेण बस डेपोमध्ये एसटीचा स्वतःचा डिझेल पंप होता. मात्र सध्या एसटी बसेस मध्ये सीएनजी भरण्यासाठी प्रायव्हेट सीएनजी पंपावर बसेसला जावे लागत आहे. या बसेसमध्ये सीएनजी भरताना अर्धा ते एक तास वेळ लागत आहे. त्यामुळे एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नोकरदार वर्गाला त्यांच्या इच्छित स्थळी कामावर जातानाही एक-एक तास उशीर होत आहे. शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांना शाळेत पोहोचायला उशीर होत आहे. तर शाळेतून घरी येणाऱ्या मुलांना घरी येण्यासाठी उशीर होत असतो. काही वेळेला रुग्णांना दवाखान्यात जाण्यासाठी उशीर होत आहे.

सीएनजी भरतेवेळी सर्व प्रवाशांना बस मधून उतरून उन्हामध्ये एक-एक तास बस सुटण्याची वाट पाहावी लागत आहे. काही प्रवासी पेण-खोपोली महामार्गालगत रस्त्यावर उभे असतात त्यातच एखादा अपघात झाला तर जबाबदार कोण ? असा प्रश्न काही जागृत प्रवासी विचारत आहेत. कित्येकदा दोन ते तीन बसेस एकत्र सीएनजी भरायला येतात आणि गर्दीच्या वेळेत वादाची परिस्थिती निर्माण होत आहे. तसेच कधी कधी एसटी कर्मचाऱ्यांना आपली ड्युटी संपली असली तरी सीएनजी भरायला गाडी घेऊन जायला सांगतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत आहे. सीएनजीमुळे या मार्गावरील प्रवासी संख्येतही घट झालेली दिसून येत आहे. त्यामुळे एसटी बसमध्ये सीएनजी भरण्यासाठी दुसरा पर्याय एसटी महामंडळाने उपलब्ध करून द्यावा जेणेकरून प्रवाशांना होणाऱ्या त्रासापासून सुटका होईल आणि प्रवासांची होणारी गैरसोय दूर होईल, अशी मागणी प्रवासी संघटनेकडून होत आहे.

प्र‌वाशांना होणाऱ्या त्रासाची आम्हास जाणीव आहे. मात्र लवकरच रामवाडी येथे एसटी डेपोचा सीएनजी पंप येत्या ८ दिवसांत सुरू करण्यात येईल.

- दीपक घोडे, रायगड विभाग नियंत्रक

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in