पटोलेंनी इतिहासाबद्दल माहिती घेऊन बोलावे; भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा टोला

काँग्रेस-मुस्लिम लीगला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी डॉ. मुखर्जी यांनी कृषक प्रजा पार्टी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉकशी आघाडी केली होती, हा इतिहास आहे. इतिहासातील घटनांबद्दल बोलताना नाना पटोले यांनी पूर्ण माहिती घेऊनच बोलावे, असा टोला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी मंगळवारी लगावला.
पटोलेंनी इतिहासाबद्दल माहिती घेऊन बोलावे; भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा टोला
Published on

प्रतिनिधी/मुंबई

स्वातंत्र्यपूर्व काळातील बंगाल प्रांताच्या सरकार स्थापनेवेळी भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी मुस्लिम लीगशी नव्हे तर फजलूल हक कृषक प्रजा पार्टीशी आघाडी केली होती. काँग्रेस-मुस्लिम लीगला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी डॉ. मुखर्जी यांनी कृषक प्रजा पार्टी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉकशी आघाडी केली होती, हा इतिहास आहे. इतिहासातील घटनांबद्दल बोलताना नाना पटोले यांनी पूर्ण माहिती घेऊनच बोलावे, असा टोला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी मंगळवारी लगावला.

“पटोले ज्या बंगाल मंत्रिमंडळाबद्दल बोलले आहेत, ते सरकार मुस्लिम लीगचे नव्हते. त्या सरकारचे मुख्यमंत्री होते, कृषक प्रजा पार्टीचे फजलूल हक. काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांना सरकार बनविण्यापासून रोखण्यासाठी डॉ. मुखर्जी यांच्या नेतृत्वाखालील हिंदू महासभा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फॉरवर्ड ब्लॉक आणि फजलूल हक यांचा कृषक प्रजा पार्टी हे तीन पक्ष एकत्र आले होते,” अशी माहिती भांडारी यांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in