सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पेण नगरपरिषदेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन

देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री असताना या विभागाच्या विकासासाठी एमएमआरडीएच्या सिमा वाढवून निधी देऊन विकास साधला; मंत्री रविंद्र चव्हाण
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पेण नगरपरिषदेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन

पेण नगरपरिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन नामदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते व आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना रविंद्र चव्हाण म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने येथील प्रश्न सोडविले नाहीत महाविकास आघाडी सरकारने नागरिकांची केवळ दिशाभूल केली. २०१४ पुर्वी ग्रामीण भागामध्ये १२ तास लोड शेडिंग व्हायचं. परंतु २०१४ नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात केलेल्या कामांमुळे महाराष्ट्रात २४ तास विज उपलब्ध आहे. देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री असताना या विभागाच्या विकासासाठी एमएमआरडीएच्या सिमा वाढवून निधी देऊन विकास साधला. भाजप सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध आहे.

या वेळी आमदार रविशेठ पाटील यांनी पेणमधील विकास कामांबाबत सातत्याने पाठपुराव करीत असून शासनाकडून भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. निवडणुका जवळ आल्या कि, विरोधकांच्या पेणमध्ये फेऱ्या वाढत ज्यांनी पेण शहरासाठी मागील काळात कोणत्याच प्रकारचा विकास निधी दिला नाही ते खासदार सुनिल तटकरे आढावा बैठका घेऊन नागिरकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत असा टोला त्यांनी लगावीला.

यावेळी माजी आमदार धैर्यशील पाटील, माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्षा प्रितम पाटील, जि.प. माजी अध्यक्षा निलिमा पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, माजी उपनगरध्यक्षा वैशाली कडू, माजी गटनेते अनिरुद्ध पाटील, अविनाश कोळी, महादेव दिवेकर, डी. बी. पाटील, प्रसाद भोईर आदींसह प्रातांधिकारी विठ्ठल इमानदार, तहसिदार स्वप्नाली डोईफोडे, मुख्याधिकारी जीवन पाटील, नगररचना अभियंता सुहास कांबळे, प्रशासन अधिकारी राजाराम नरुटे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in