
लुटालूटिच्या दृष्टीने अद्यापही काहीसा सुरक्षित असलेला मुंबई-गोवा महामार्गही आता अवैध धंदेवाल्यांचा अड्डा बनू लागला आहे. रस्त्याचे काम सुरु असले तरी या मार्गाने कोकणात रात्रीच्यावेळी लक्झरी बसेस, खासगी कार ये-जा करत असतात. त्यांच्यासाठी हादरवणारी घटना आज पहाटे २:४५ वाजता घडली.
पेण तालुक्यातील कोपर फाटा येथील हॉटेल मिलन पॅलेस समोर तिन गाड्यामधून आलेल्या १० ते १५ जणांच्या टोळक्याने फिर्यादी प्रशांत प्रकाश मोहिते आणि कुटुंबिय हे त्यांच्या मालकीच्या बोलेरो जीप क्र. एमएच-०६-एझेड-१४५१ ने दापोली वरून बोरीवलीकडे जात असताना मौजे पेण हद्दीतील हॉटेल साई सहारा हॉटेलच्या आवारात जात असतांना राखाडी रांगाच्या इरटीगा कारने आलेल्या गाडीतील चालकाच्या बाजूकडील बसलेल्या आरोपीने प्रशांत मोहिते यांच्या याांच्या गाडीच्या काचेवर २ दगड मारले आणि शिविगाळ करत गाडी पुढे नेली. मोहिते यांनी दगड का मारला याचा जाब विचारला असता आरोपीच्या इरटीगा गाडीने फिर्यादी मोहिते यांच्या गाडीला उजव्या बाजूने डेश मारून गाडी थांबविलि. त्याच वेळी मागून आलेल्या व्होल्कस वेगन आणि मारुती सुझुकी स्विफ्ट क्र. आरजे४३सीए-५१५५ यातून आलेल्या १० ते १५ आरोपिंनी मोहिते यांना व त्यांच्या कुटुंबियांना मारहाण सुरु केली. त्यांच्या आंगावरील ४ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा सुमारे १५ टोळे वजनाचा सोन्याच्या ऐवज लुटुन तेथून पळ् काढला.
यावेळी आरोपींनी गुन्ह्यावेळी वापरलेली लाल रंगाची स्विफ्ट कार पळून जाताना बंद पडली ती कार तिथेच सोडून चोरट्यांनी पळ काढला. सध्या ही कार दादर सागरी पोलीसांनी जप्त केली आहे. सदरचा गुन्हा हा दादर सागरी पोलीस ठाणे येथे गु.र.नं.४४/२०२३ भा.द.वि. कलम ३९५, ३५४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अजित गोळे-प्रभारी अधिकारी दादर सागरी पोलीस ठाणे हे करीत आहेत.