राज्यपालांच्या वक्तव्याबद्दल पेणमधील शिवप्रेमींनी केली निदर्शने

बेताल वक्तव्य वारंवार हेतू पुरस्कार तर होत नाही ना याची राज्य सरकारने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी
राज्यपालांच्या वक्तव्याबद्दल पेणमधील शिवप्रेमींनी केली निदर्शने

राज्यपाल भगतसिंग कोष्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल केलेल्या चुकीच्या विधाना बाबत आज पेण शहारातील विविध प्रकारच्या शिवप्रेमी संघटनांनी एकत्र येऊन निषेध व्यक्त केला आणि त्याबाबतचे निवेदन तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांना पेण तहसिल कार्यालयात जाऊन दिले.
           
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वारंवार आक्षेपार्य विधान राज्यपाल कोष्यारी करत असल्याचा आरोप करत तसेच महाराजांबाबत  वारंवार एकेरी उल्लेख करून त्यांची तुलना ही सामान्य व्यक्तींच्या सोबत केली जात असल्याचा आरोप करत आज हे निवेदन देण्यात आले. हे असे बेताल वक्तव्य वारंवार हेतू पुरस्कार तर होत नाही ना याची राज्य सरकारने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी आणि महाराष्ट्राला नवीन राज्यपाल देण्यात यावा,आमच्या राजाचा अपमान करणाऱ्या आमच्या राजाचा इतिहासही माहीत नसलेल्या या कोषारींना महाराष्ट्रातून कायमचे हाकलून द्यावे अशा प्रकारची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. शिवाय जर का अशाच घटना अशीच वक्तव्य यांच्याकडून होत राहिली तर विनाकारण महाराष्ट्रात अशांततेचे वातावरण पसरवण्यास हेच राज्यपाल जबाबदार असतील असा इशारा देखील या निवेदनातून देण्यात आला आहे.स्वराज्य संघटना, स्वराज्य प्रतिष्ठान,सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान ,पेण मैत्री ग्रुप, शिवतेज मित्र मंडळ,शब्दभेदी सामाजिक संस्था तसेच समस्त शिवप्रेमी एकत्र येऊन आणि राज्यपाल भगतसिंह कोषारी यांच्या निषेधाच्या घोषणा देत संपूर्ण पेण शहरातुन निषेध रॅली काढून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.

राज्यपालांच्या वक्तव्यामुळे समस्त शिवप्रेमींची मने दुखावली गेली आहेत. राज्याच्या बाहेरून येणाऱ्या माणसांना शिवाजी महाराज कधीच कळले नाहीत. त्यामुळे त्यांना राज्यामध्ये राहण्याचा आणि महाराष्ट्रातील पदे भूषविण्याचा काहीही अधिकार नाही. राज्य सरकारने या वक्तव्याची चौकशी करावी.

मंगेश दळवी, माजी सरपंच -  कामार्ली

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in