पेण तालुक्यातील ४७ शाळांचे रूपडे बदलणार; जिल्हा परिषद सेस फंड, जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून दुरुस्ती

पेण तालुक्यातील ४७ शाळांना गतवर्षी नवा लूक मिळणार असून त्याची पूर्तता केली जाणार आहे…. एप्रिलमध्ये झालेला अवकाळी पाऊस अन् वादळी वाऱ्याच्या तडाख्यात काही शाळांची पडझड झाल्याचे दिसून आले.
(प्रातिनिधिक छायाचित्र)
(प्रातिनिधिक छायाचित्र)
Published on

पेण : पेण तालुक्यातील ४७ शाळांना गतवर्षी नवा लूक मिळणार असून त्याची पूर्तता केली जाणार आहे…. एप्रिलमध्ये झालेला अवकाळी पाऊस अन् वादळी वाऱ्याच्या तडाख्यात काही शाळांची पडझड झाल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची देखभाल, डागडुजीची कामे युद्धपातळीवर सुरू झाली आहेत…. या कामांमुळे शाळांचे रूपडे बदलणार असून जून महिन्यात सुरू होणाऱ्या शाळा विद्यार्थ्यांसाठी अधिक आकर्षणाचा विषय ठरणार आहे. यावर्षी पेण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी जिल्हा परिषद सेस फंड आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून २ कोटी १३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने तालुक्यातील ४७ शाळांना नवा साज चढविण्यात येत आहे. यामुळे पावसाळ्यापूर्वी सर्व शाळांचा नवा लूक विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज असणार आहे.

जिल्हा परिषद सेस फंड शाळागृह देखभाल आणि दुरुस्तीच्या माध्यमातून तुरमाळ आणि निगडे जिल्हा परिषद शाळांना ८ लाख ८४ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीतून शाळांची विविध कामे करण्यात येणार आहेत. शिवाय प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण ६ योजनेच्या माध्यमातून निधवली ग्रामपंचायत हद्दीतील कावजी वाडी जिल्हा परिषद शाळेची पत्राशेड टाकण्यासाठी पाच लाख रुपये मंजूर झाले आहेत.

२ कोटी १३ लाख रुपये मंजूर

तरणखोप, वाशी, दुश्मी, हेटवणे, कुहीरे कातकरी वाडी, तळवली, कामार्ली आदिवासी वाडी, खारपाले, टाकाची वाडी, कोप्रोली, वाकरूळ, सिंधलाची वाडी, करंबेली आराव, वढाव यांसह एकूण ४७ जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वर्गखोल्या आणि दुरुस्तीसाठी तब्बल २ कोटी १३ लाख रुपये मंजूर झाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in