एसटी महामंडळाचा दिव्यांगांसाठी मोठा निर्णय; प्रवास होणार अधिक सुखकर अन् आरामदायी!

एसटी महामंडळाचा दिव्यांगांसाठी मोठा निर्णय; प्रवास होणार अधिक सुखकर अन् आरामदायी!

दिव्यांग प्रवाशांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्यात आले आहे.
Published on

मुंबई : दिव्यांग प्रवाशांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये  आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्यात आले आहे. ते कोणत्याही थांब्यावर चढल्यास त्यांना त्यांचे आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे. त्यामुळे दिव्यांगांचा प्रवास अधिक सुखकर व आरामदायी होणार आहे. 

एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने एक परिपत्रक काढून एसटीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बसेस मध्ये दिव्यांगांना आरक्षण आसने निश्चित केलेली आहेत. साध्या बसेसपासून शिवनेरी बसेसपर्यंत दिव्यांग प्रवाशांना प्रवासाच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचे आरक्षित आसन राखीव ठेवण्याचे सूचना एसटी महामंडळाने स्थानिक एसटी प्रशासनाला दिलेल्या आहेत. ज्यावेळी बसमध्ये ‍दिव्यांग प्रवासी प्रवास करित नसतील तेव्हा ते आसन सामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध होईल. तथापि, दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर बसमध्ये चढल्यावर त्यांना ते आसन तातडीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असेल. याबरोबरच दिव्यांगांना प्रवास करताना कोणती अडचण येऊ नये म्हणून त्यांना चढ-उतार करताना प्राधान्य द्यावे, तसेच त्यांचा थांबा आल्यानंतर त्यांना अवगत करून बसमधून उतरण्यासाठी चालकवाहकांनी सर्वतोपरी मदत करावी, असे निर्देश देखील महामंडळाने दिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in