महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

महिला डॉक्टरच्या आत्महत्याप्रकरणी संशयित म्हणून अटक करण्यात आलेल्या सेवामुक्त पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने आणि प्रशांत किसन बनकर यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी
Published on

कराड : फलटण येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्याप्रकरणी संशयित म्हणून अटक करण्यात आलेल्या सेवामुक्त पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने आणि प्रशांत किसन बनकर यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासात नव्याने उघड झालेल्या बाबींवर चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाने कोठडी वाढीची मागणी केल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला.

यापूर्वी या दोन्ही संशयितांना पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले होते. मात्र राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन केले. पथकाने कागदपत्रांची पाहणी करून न्यायालयाच्या परवानगीने संशयितांना पुन्हा ताब्यात घेतले. शनिवारी संशयितांना कळंबा कारागृह, कोल्हापूर येथून फलटण न्यायालयात आणण्यात आले. सरकारी वकिलांनी पुढील तपासासाठी दोघांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र संशयितांच्यावतीने ॲड. धायगुडे यांनी विरोध केला. सुनावणीनंतर न्यायालयाने २४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर करताना फलटण पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

logo
marathi.freepressjournal.in