
पोलादपूर : तालुक्यातील पितळवाडी गावातील इसमाने दारूच्या नशेत घरातील बेडरूममध्ये लोखंडी पाइपला साडी बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली.
मयत काशिनाथ शंकर चव्हाणला (५९) दारूचे अतिव्यसन होते. दारूच्या नशेत त्याने घरातील बेडरूममधील लोखंडी पाइपला साडी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी ठाण्यात सागर काशिनाथ चव्हाण याच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस हवालदार नितेश कोंढाळकर हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत आहेत.
याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. तसेच आत्महत्या की हत्या याबाबत पोलिसांनी शोधकार्य सुरू केले आहे. त्यामुळे आगामी काळात याचा उलगडा होईल.