पुण्यात पिझ्झा डिलीव्हरी बॉयला मारहाण

पोलिसांनी पडवळला भारतीय दंड संहिता कलम ३०८, ३२३ आणि ५०४ अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक केली.
पुण्यात पिझ्झा डिलीव्हरी बॉयला मारहाण

पुणे : पिझ्झा उशिरा डिलिव्हरी केल्याच्या रागातून डिलीव्हरी बॉयला मारहाण केल्याप्रकरणी पुण्यात एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी या तरुणाने हवेत गोळीबार करत दहशतही माजवण्याचा प्रयत्न केला. चेतन पडवळ असे या तरुणाचे नाव आहे.

सोमवारी रात्री शहरातील वाघोली परिसरातील एका लोकप्रिय पिझ्झा आउटलेटवर चेतनने पिझ्झा ऑर्डर दिली. ‘‘डिलिव्हरी बॉय ऋषिकेश अन्नपुर्वे पडवळ याच्या घरी पोहोचला. त्यावेळी ऑर्डर उशिरा दिल्याबद्दल चेतनने त्याला शिवीगाळ आणि मारहाण केली. अन्नपुर्वेचे दोन सहकारी त्यांच्या कर्मचाऱ्याला मारहाण का केली, याचा जाब विचारण्यासाठी गेले असता पडवळ याने चेतनने त्यांना मारहाण केली. यावेळी डिलीव्हरी बॉयनी चेतनलाही मारहाण केली” असे लोणीकंद पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर संतप्त पडवळने त्याच्या रो-हाऊसजवळ उभ्या असलेल्या एसयूव्हीकडे धाव घेतली, त्याने पिस्तूल काढली आणि हवेत गोळीबार केला. अन्नपुर्वेच्या तक्रारीवरून, पोलिसांनी पडवळला भारतीय दंड संहिता कलम ३०८, ३२३ आणि ५०४ अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक केली. दरम्यान, डिलीव्हरी बॉयला झालेल्या या मारहाणीच्या निषेधार्थ पुण्यात सर्व डिलीव्हरी बॉयनी काम बंद आंदोलन केल्याने नागरीकांची मोठी अडचण झाली.

logo
marathi.freepressjournal.in