नांदेडमधील प्रलंबित रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्व्हेक्षणास मंजुरी, मंजूर करून घेण्यासाठी केंद्रात सतत प्रयत्न केले असल्याची माहिती खा. चिखलीकर यांची माहिती

काँग्रेस राजवटीच्या कार्यकाळातील गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या नव्या रेल्वे मार्गाचा प्रलंबित प्रश्‍न अवघ्या पाच वर्षाच्या भाजपा खासदाराच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निकाली काढला आहे.
नांदेडमधील प्रलंबित रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्व्हेक्षणास मंजुरी, मंजूर करून घेण्यासाठी केंद्रात सतत प्रयत्न केले असल्याची माहिती खा. चिखलीकर यांची माहिती

नांदेड : काँग्रेस राजवटीच्या कार्यकाळातील गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या नव्या रेल्वे मार्गाचा प्रलंबित प्रश्‍न अवघ्या पाच वर्षाच्या भाजपा खासदाराच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निकाली काढला आहे.

नांदेडच्या जनतेने भाजपा खासदाराला निवडून दिल्यामुळेच रेल्वेचे मोठे चार प्रकल्प मंजूर होवू शकले. मोदी सरकार विकासाच्या गॅरंटीवर जिल्ह्यातील जनतेने शिक्कामोर्तब करण्याचे मत बनवून अब की बार ४०० पार मोदी सरकार बनविण्याचा निश्‍चय केला असल्याचा दावा नांदेड जिल्ह्याचे भाजप खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केला आहे.

खासदार या नात्याने गेल्या महिन्यातच बोधन-बीदर, नांदेड-लोहा-लातूर, बोधन-मुखेड-लातूर या नव्या तीन रेल्वे मार्गास मंजूरी देण्याची विनंती करण्यासाठी जिल्ह्यातील रेल्वे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ घेवून रेल्वे मंत्र्यांना भेटलो. या शिष्टमंडळात माजी खा. डॉ. व्यंकटेश काब्दे, रेल्वे संघर्ष समितीचे पदाधिकारी संपादक शंतनु डोईफोडे, उद्योजक व रेल्वे प्रश्‍नाचे अभ्यासक हर्षद शहा आदिंची या शिष्टमंडळात समावेश होता. रेल्वेच्या प्रश्‍नासाठी संघर्ष करणारे ज्येष्ठ संपादक सुधाकरराव डोईफोडे हे आज हयात नाहीत; पण त्यांच्या पश्‍चात त्यांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे खा. चिखलीकर यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर जिल्ह्यातील रेल्वे मार्गाचे जाळे निर्माण करण्यात भाजपाचे खासदार या नात्याने आपल्याला यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करुन हे नवीन रेल्वे मार्ग मंजूर केल्याबद्दल खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत.

रेल्वेचे चार मोठे प्रकल्प मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न

गेल्या पाच वर्षांत आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात रेल्वेचे प्रलंबीत असलेले विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी संसदेत आवाज उठविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सतत पाठपुरावा करुन नांदेड-बीदर या नव्या रेल्वे मार्गाची मंजूरी प्राप्त करुन राज्य शासनाकडून ७५० कोटी रुपयांचे बजेट मंजूर करून घेतले. महाराष्ट्र भाजपाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून नांदेड जिल्ह्यातील रेल्वेचे चार मोठे प्रकल्प मंजूर करून घेण्यासाठी केंद्रात सतत प्रयत्न केले असल्याची माहिती खा. चिखलीकर यांनी व्यक्त केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in