महाराज, मला माफ करा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा माफीनामा

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी राज्यातील महायुती सरकार चांगलेच अडचणीत आल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वाढवण येथे यासंबंधी जाहीर माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
महाराज, मला माफ करा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा माफीनामा
ANI
Published on

पालघर : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी राज्यातील महायुती सरकार चांगलेच अडचणीत आल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वाढवण येथे यासंबंधी जाहीर माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे मी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन शिवप्रेमींची जाहीर माफी मागतो, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महत्त्वाकांक्षी वाढवण बंदराचे भूमिपूजन शुक्रवारी पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी या बंदराचे महत्त्व अधोरेखित करत त्याचा महाराष्ट्राच्या विकासाला मोठा हातभार लागणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र तत्पूर्वी ते म्हणाले की, ‘काही दिवसांपूर्वी जे सिंधुदुर्गमध्ये घडले ते अत्यंत दुःखद आहे. शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर ते आमचे आराध्य दैवत आहेत. मी आज नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो. तसेच जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात, या घटनेमुळे ज्यांच्या मनाला वेदना झाल्या आहेत, त्यांची मी नतमस्तक होऊन नम्रपणे माफी मागतो. कारण आपल्या दैवतापेक्षा मोठे काहीही नाही, या संस्कारात मी वाढलो आहे.’

सावरकरांचा अपमान करणाऱ्यांनी माफी मागितली का?

पंतप्रधान मोदींनी पुतळ्याच्या घटनेबाबत माफी मागितल्यानंतर काँग्रेसवर जोरदार टीका केली. ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांवर वारंवार बोलले जाते, त्यांचा अपमान केला जातो, तरीही याबाबत कधीच माफी मागितली जात नाही. विरोधकांना याबाबत कधीही पश्चात्ताप झालेला नाही. कारण ते त्यांचे संस्कार आहेत. आमचे ते संस्कार नाहीत’, असे म्हणत त्यांनी काँग्रेस व राहुल गांधींवर अप्रत्यक्ष टीका केली. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फुटी पुतळा २६ ऑगस्टला कोसळला. ज्याचे अनावरण ४ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली. मालवणमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये यावरून जोरदार राडाही झाला होता. विरोधी पक्षांकडून या घटनेचा विविध ठिकाणी आंदोलन करून निषेध केला गेला. यादरम्यान विरोधी पक्षांनी सरकारवर टीका करत पंतप्रधान मोदींनी माफी मागावी, अशी मागणी केली होती.

‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’चा दावा कुठे गेला - वर्षा गायकवाड

पंतप्रधान मोदींनी माफी मागितल्यानंतर खासदार आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. ‘नवशक्ति’शी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘फक्त माफी मागून सरकारचे पाप धुवून निघणार नाही. आठ महिन्यांत पुतळा कोसळला, तर केवळ ठेकेदारावर कारवाई करणे पुरेसे नाही. ईडी आणि सीबीआयचा वापर राजकीय कारवायांसाठी केला जातो. ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’, असा दावा करणाऱ्या पंतप्रधानांनी या प्रकरणाचीही अशीच चौकशी करायला हवी. तीन दिवसांपूर्वी राज्यसभेचे खासदार आणि शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी पुतळा साकारणारे शिल्पकार जयदीप आपटे हे श्रीकांत शिंदे यांचे मित्र असल्याचा आरोप केला होता. मोदींच्या माफीनाम्यानंतर संजय राऊत यांनी हा प्रश्न पुन्हा उपस्थित केला. ‘तुम्ही हजार वेळा माफी मागाल, पण महाराष्ट्राने ती स्वीकारली पाहिजे. तुम्हाला तुमच्या चुकांची उत्तरे द्यावी लागतील. पण सांगा, कोणाच्या शिफारशीवरून शिल्पकाराला हे काम मिळाले?’ असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

काँग्रेस पक्षाने पक्षाच्या नेत्यांना स्थानबद्ध करण्याच्या पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईवर संताप व्यक्त केला. शुक्रवारी पहाटेपासूनच त्यांच्या निवासस्थानी पोलीस तैनात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘सकाळी ७ वाजल्यापासून पोलीस माझ्या घरी होते. त्यांनी मला दोन पावलेही चालू दिले नाही. पंतप्रधानांना माफी मागायला सांगणे किंवा मूक आंदोलन करणे हा गुन्हा आहे का? हे लोकशाही अधिकाराचे उल्लंघन आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून काँग्रेस नेत्यांना स्थानबद्ध केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

यंदा ‘पीओपी’च्या गणेशमूर्तींना बंदी नाही

आले आहेत. ‘पीओपी’ मूर्तींचा वापर वाढला आहे. ‘पीओपी’ पाण्यात विसर्जित केल्यामुळे पर्यावरणाची चिंता वाढली आहे. कारण ‘पीओपी’मुळे प्रदूषणात वाढ होत आहे. ‘पीओपी’ हे जिप्समपासून बनविलेले साहित्य आहे. पण, त्यातील रसायनांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. याचा पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. म्हणून, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण संस्थेने नैसर्गिक पाणवठ्यांमध्ये या मूर्तींचे विसर्जन केल्यामुळे होणाऱ्या जलप्रदूषणामुळे ‘पीओपी’च्या वापरावर पूर्ण बंदी घालण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने राज्यातील सर्व मनपाच्या आयुक्तांना व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केंद्रीय प्रदूषण मंडळांच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.

राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी खंडपीठाला माहिती दिली की, पर्यावरण विभागाने सर्व जिल्हा दंडाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नगरपरिषदांचे मुख्य अधिकारी यांच्यासाठी परिपत्रक जारी केले आहे. ज्यात ‘मूर्तीसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी’, असे म्हटले आहे. मुंबई मनपाचे वकील मिलिंद साठे यांनी सांगितले की, गणेशोत्सव राज्यात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. मूर्ती बनवण्याच्या व्यवसायावर अनेकांचे उद्योग चालतात. मुंबई मनपाने टप्प्याटप्प्याने नियमांची अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. ‘लालबागचा राजा’ व पुण्यातील दगडूशेठ गणपती या मोठ्या मंडळांना प्रदूषण नियंत्रणांची मार्गदर्शक तत्त्वांची अंमलब

झाल्या चुकीला माफी नाही - विरोधक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाने त्यांची माफी धुडकावून लावली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, ‘शिवाजी महाराजांनी भ्रष्टाचार व निष्काळजीपणाला केव्हाच माफी दिली नव्हती. त्यामुळे साहेब, महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकत नाही’. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे की, ‘पंतप्रधानांनी माफी मागून एकप्रकारे सरकारची चूकच मान्य केली आहे. पण हा प्रश्न केवळ माफी मागून सुटणार नाही.

काँग्रेस नेते पोलिसांकडून स्थानबद्ध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पालघर दौऱ्यापूर्वी काँग्रेसकडून शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे मोदींच्या दौऱ्याआधीच सकाळी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, पक्षाचे इतर नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ज्यात आमदार नसीम खान, अस्लम शेख, भाई जगताप आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी, अशी त्यांची मागणी होती.

२०२९ मध्ये मी पुन्हा येईन - मोदी

२०२९ रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मी चौथ्यांदा निवडून येईन, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मुंबईत झालेल्या ‘ग्लोबल फिनटेक २०२४’ उद्योगाच्या परिषदेत ते बोलत होते. ही पाचवी जागतिक फिनटेक परिषद आहे. मी २०२९ रोजी होणाऱ्या १० व्या फिनटेक परिषदेत उपस्थित राहीन, असे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in