जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी जळगाव दौऱ्यावर येत असून पंतप्रधानांच्या स्वागताला प्रशासन सज्ज झाले आहे.
पंतप्रधान मोदी यावेळी लखपती दीदींसमवेत संवाद साधणार आहेत. या सोहळ्याला सव्वा ते दीड लाख महिला उपस्थित असतील, असे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी येथे सांगितले. जळगाव विमानतळाजवळच एक गाव वसवले असून तेथे सुमारे बचत गटाचे शंभर स्टॉल लावण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी विमानतळावरून या वसवलेल्या गावाला भेट देतील.