उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पोलादपूरमध्ये 'मुंबई पॅटर्न'? अपक्ष व डमी उमेदवारांच्या अपेक्षा वाढल्या

तालुक्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत हिरिरीने नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा 'मुंबई पॅटर्न' कधी सुरू होणार, याची चर्चा रंगू लागली आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

पोलादपूर : तालुक्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत हिरिरीने नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा 'मुंबई पॅटर्न' कधी सुरू होणार, याची चर्चा रंगू लागली आहे. बॅण्डसह अपक्ष तसेच डमी उमेदवारांनाही 'काय तरी द्या'ची लागण झाल्याचे चित्र पहावयास मिळत असून, तडजोडीतून मोठ्या अपेक्षा उमेदवारांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

पोलादपूर तालुक्यात पंचायत समितीच्या चार गणांसाठी २४ तर जिल्हा परिषदेच्या दोन गटांसाठी ११ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली होती. छाननीदरम्यान माटवण गणातील एका नामनिर्देशित महिला उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने पंचायत समितीच्या चार गणांसाठी ही संख्या २३ वर आली आहे. त्यानुसार लोहारे (५९) जिल्हा परिषद सर्वसाधारण गटात ८ उमेदवार, कापडे बुद्रुक (५८) जिल्हा परिषद नामनिर्देशित गटात ३ उमेदवार, माटवण (११५) नामनिर्देशित महिला पंचायत समिती गणात ३ उमेदवार, कापडे बुद्रुक (११६) सर्वसाधारण पंचायत समिती गणात ८ उमेदवार, लोहारे (११७) सर्वसाधारण महिला गणात ५ उमेदवार, तर कोतवाल बुद्रुक (११८) सर्वसाधारण गणात ७उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत. या पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यातील चारही पंचायत समिती गणांमध्ये तसेच दोन्ही जिल्हा परिषद गटांमध्ये थेट किंवा तिरंगी लढतींचे चित्र २८ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.

(शप)-रिपाइं पोलादपूर तालुक्यात उबाठा-मनसे बॅण्ड, शिवसेना-शेकाप, भाजप-राष्ट्रवादी-राकाँ (आठवले गट) तसेच काँग्रेस व जनता दल (सेक्युलर) या स्वतंत्र राजकीय समीकरणांमध्ये 'एकला चलो'ची भूमिका स्पष्ट होताना दिसत आहे.

logo
marathi.freepressjournal.in