पोलिस शिपाई विशाल पवारांना होतं दारूचं व्यसन; माटुंग्यातील बारमध्ये विकली होती अंगठी ...पोलीस तपासात काय आलं समोर?

पोलीस शिपाई विशाल पवार मृत्यू प्रकरणातील गूढ आणखी वाढलं आहे. याबाबत समोर आलेल्या नव्या माहितीमुळं पोलिसांसमोरचा पेच आणखी वाढला आहे.
विशाल पवार
विशाल पवार

मुंबई: पोलीस शिपाई विशाल पवार मृत्यू प्रकरणातील गूढ आणखी वाढलं आहे. याबाबत समोर आलेल्या नव्या माहितीमुळं पोलिसांसमोरचा पेच आणखी वाढला आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, विशाल पवार यांना दारूचं व्यसन असल्याचं त्यांच्यासोबत काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी ते नेहमी ठाणे, दादर तसेच माटुंगा येथील बारमध्ये जात. २८ एप्रिल रोजी त्यांनी माटुंग्यातील एका बारमध्ये आपली अंगठी विकली. त्यांच्या जास्त मद्यपानाच्या सवयीमुळे बहुधा अवयव निकामी झाले, परिणामी त्याचा मृत्यू झाला, असा पोलिसांना संशय आहे.

सीसीटीव्ही फुटेजने सत्य समोर आणले:

पवार यांनी मृत्यूपूर्वी दिलेली माहिती आणि साक्षीदार तसेच सीसीटीव्ही फूटेज यामध्ये विरोधाभास आढळला. २७ एप्रिलची रात्र आणि २८ एप्रिलच्या पहाटे पवार विविध बार आणि स्टेशन्सवरती दिसून आले होते. दादरमध्ये दारू पिल्यानंतर त्यांनी संपूर्ण रात्र परेल रेल्वे स्टेशनवर बसून घालवली.त्यानंतर ठाण्यामध्ये आपल्या पुतण्यासोबत त्यांनी पुन्हा थोडी दारु प्यायली. त्यामुळं मृत्यूपूर्वी त्यांनी दिलेल्या माहितीत तथ्य नसल्याचं समोर आलं.

कावीळ आणि किडनीचा त्रास अशा आरोग्याच्या समस्यांना ते सामोरे जात होते. कदाचित आपल्या कुटुंबाची बदनामी होऊ नये, तसेच त्यांना नुकसानभरपाईचे फायदे मिळावे, यासाठी त्यांना लुटीची कथा तयार करावी लागली असावी, असं पोलिस तपासांना संशय आहे.

अवयव निकामी झाल्यामुळे विशाल पवारांचा मृत्यू?

29 एप्रिल रोजी ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर पवार यांची प्रकृती अधिकच बिघडली, त्यामुळे 1 मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. चोरांनी विषारी इंजेक्शन दिल्याचा त्यांचा प्राथमिक दावा होता. मात्र वैद्यकीय निष्कर्षामध्ये मृत्यूचे संभाव्य कारण अल्कोहोलमुळं अवयव निकामी झाल्याचं निर्देशित करण्यात आलं आहे.

GRP आयुक्त रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली डीसीपी मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या तपासात सीसीटीव्ही फुटेज आणि आर्थिक नोंदी यांची सखोल छाननी करण्यात आली. एसीपी सुनील गावकर आणि वरिष्ठ निरीक्षक अनिल कदम यांनी चौकशीचे नेतृत्व केले.

logo
marathi.freepressjournal.in