'ती' कृती करणं भोवलं, काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे आणि यशोमती ठाकूरांसह १५ जणांवर गुन्हा दाखल

पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना खासदार बळवंत वानखडे आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्यासमोर हा विषय मांडला.
'ती' कृती करणं भोवलं, काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे आणि यशोमती ठाकूरांसह १५ जणांवर गुन्हा दाखल
Published on

अमरावती: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत अमरावती मतदारसंघात काँग्रेसच्या बळवंतराव वानखेडे यांनी भाजपच्या नवनीीत राणा यांचा पराभव केला होता. दरम्यान निवडणूकीचा निकाल लागून जवळपास ती आठवड्यांचा काळ होऊनही अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेलं खासदारांसाठीच्या संपर्क कार्यालयाचा ताबा दिला जात नसल्यामुळं खासदार बळवंत वानखेडे आणि काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी खासदार संपर्क कार्यालयाचे कुलूप तोडून काँग्रेस कार्यकर्त्यांसह आत प्रवेश केला. याप्रकरणी पोलिसांनी खासदार बळवंत वानखडे, यशोमती ठाकूर यांच्यासह १५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट आणि नंतर...

लोकसभा निवडणूकीचा निकाल ४ जूनला लागला. या निवडणूकीत अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी भाजपच्या नवनीत राणांचा पराभव केला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेले खासदार कार्यालय नवनीत राणा यांनी खाली करून बरेच दिवस होऊन गेले, तरीही या कार्यालयाचा ताबा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवनिर्वाचित खासदाराला देण्यात आला नव्हता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना खासदार बळवंत वानखडे आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्यासमोर हा विषय मांडला. चंद्रकांत पाटील यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला मात्र यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखेडे यांनी आक्रमक भूमिका घेत कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या खासदारांच्या संपर्क कार्यालयाचं कुलूप तोडलं आणि आतमध्ये प्रवेश केला.

१५ जणांवर गुन्हा दाखल...

काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे आणि आमदार यशोमती ठाकूर यांना असं करणं भोवलं असून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या दोघांसह एकूण १५ काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in